भारतीय गोवंशाचे अस्तित्व वाचवणे आवश्यकच

From One Cow One Family
Jump to: navigation, search

गोवंशाची कृषी विषयक उपयोगिता

भारतीय गोवंश आधारीत शेणखत,कंपोस्ट खत वापरून किंवा शेती केल्यास त्या पिकांतून ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशियम तत्त्व मिळून हृदयविकाराचा धोका टळू शकतो. रासायनिक खते वापरलेल्या शेतातील अन्नधान्यामुळे आवश्यक मॅग्नेशियम तत्त्व मिळत नाही. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची पाणी धारक क्षमता १६ प्रतिशत कमी होते. जमिनीची उर्वराशक्ती कायम ठेवणारे सूक्ष्म जीव आणि गांडूळ याची संख्या कायम ठेवणारा ‘ह्यूमस’ नावाचा पदार्थ कमी होतो. शेणखतामुळे ‘ह्यूमस’चे प्रमाण संतुलित राहून सूक्ष्म जीव, गांडूळ जमिनीला सच्छिद्र बनवतात. पाणी धारण क्षमता १६ प्रतिशत वाढवतात. उर्वराशक्ती कायम ठेवतात. रासायनिक किटकनाशकांऐवजी देशी गाईचे ९० प्रतिशत गोमूत्र आणि १० प्रतिशत शेण मिळून फवारणी केल्यास सकस अन्नधान्य, भाजीपाला व फळे प्राप्त होतात.

भारतीय गोवंशाची वैशिष्ट्ये

भारतीय गोवंश ‘बॉस इंडिकस’ या वर्गात येतो.

 • भारतीय गोवंशाला पाठीच्या सुरुवातीला खोंड आहे. त्यामागे सूर्यकेतू नाडी आणि शिंगांमध्ये आकाशतत्त्व असल्याने सूर्यापासून एक शक्तीस्त्रोत प्राप्त होऊन तो दुधामध्ये ‘कॅरॉटीन’ या स्वरूपात उपलब्ध होतो. त्यापासून ‘व्हिटॅमिन’ ए,ई आणि सुवर्णक्षारCauriaum Hydrate प्राप्त होते. प्रतिकारशक्ती प्राप्त होते.
 • भारतीय गोवंशाच्या शरीरात घामग्रंथी जास्त आहेत. एका क्युबिक मिलीमिटर कातडीमध्ये १६०० रोम कूप असतात. तसेच पृष्ठभागावरील मांसपेशीचे स्वयंस्फूर्त आकुंचन आणि प्रसरण होते. त्यामुळे उष्तामानातील संतुलन राखून जगामध्ये कुठेही भारतीय गोवंश टिकून राहू शकतो.
 • भारतीय गोवंशाची कातडी सूक्ष्म केसाळ असल्यामुळे बाह्यकृमी प्रभाव अत्यंत कमी होतो.
 • मूत्र सेवनाने दुर्दम्य प्रतिकारशक्ती प्राप्त होते. त्यामुळे महागड्या आणि घातक आधुनिक चिकित्सा पद्धतीची गरज भासत नाही आणि पारंपारिक घरगुती चिकित्सेने आरोग्य चांगले राहते.
 • भारतीय गोवंशाची जोपासना करतांना निम्न उर्जापातळी जास्त दूध देणार्‍या गार्इंनाही चारा वैरण जास्त द्यावे लागते. खाद्य कमी लागते. उदा. १० लिटर दूध देणार्‍या देशी गाईला १ किलो खुराक द्यावी लागते.
 • देशी गाईच्या दूधात सूक्ष्म तूपाचे कण ३.७० मायक्रॉन जाडीचे असल्यामुळे ते मेंदूच्या आवरणामधून प्रवेश करू शकतात. तसेच प्रथिने ही ‘बीटा केसीन ए २’ असल्यामुळे तसे ‘ओमेगा ३ व ६ तत्त्व’ यामुळे हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आरोग्याला उपकारक असून त्यामुळे मानवीय आरोग्य उत्तम राहते.‘संकरीत गायी’च्या दुधामध्ये ४.८७ मायक्रॉन जाडीचे सूक्ष्म तुपाचे कण असून ते मेंदूच्या आवरणातून प्रवेश करू शकत नाहीत. तसेच ‘बीटा केसीन ए १’ प्रथिने असतात. तसेच ‘ओमेगा ३ व ६ तत्व’ नसल्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि मस्तिष्क विकार होतात. देशी गार्इंच्या दुधामध्ये ‘सॉलीबर फॉस्फेट’ हे तत्त्व संतुलित प्रमाणात म्हणजे १ मिली लिटरमध्ये १८ मायक्रोग्रॅम असल्यामुळे ते पचायला सोपे जाते. कुठल्याही वयात आणि आजारी व्यक्तीला ही उपकारक आहे. देशी गाईच्या तुपामुळे ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत नाही.
 • भारतीय गोवंशाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन अमेरिकेने १८३५ मध्ये इंग्लंडमार्गे भारतातून ‘अंगोल’, ‘गीर’, ‘धारपारकर’, ‘सहीवाल’, ‘अंकोला वाटसी’ जातीचे वळू नेऊन गायीची एक जात तयार केली. त्याला ‘ब्राह्मण गाय’ असे म्हणतात. त्या सर्व दृष्टीने उपयुक्त आहेत. क्युबा या अमेरिकन देशाने ‘सहीवाल गाय’ नेऊन कृषी आणि आर्थिक प्रगती केली. आज जगामध्ये संपूर्ण जैविक शेती करणारा क्युबा हा एकमेव देश आहे. ब्राझीलने ७ वर्षांपूर्वी आपल्या देशातून भारतीय ‘वळू’ नेऊन भरपूर प्रगती केली आहे. आज ब्राझीलचे ९० प्रतिशत पशूधन भारतीय गोवंशावर आधारीत आहे.

‘सहीवाल गायी’ या भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु अनेक देशांनी सहीवाल गायी नेऊन त्यांची प्रगती करून घेतली, त्यामुळे या गायींना ‘भारताची राजदूत’ म्हणतात.

भारतीय गायींची वैशिष्ट्ये

 • भारतीय जातीच्या गायी स्थानिक वातावरणाशी एकरूप झाल्या आहेत. त्या उन्हाळा सोसण्यास सक्षम आहेत.
 • त्यांना अल्प पाणी लागते.
 • त्या लांबचा प्रवास करू शकतात.
 • भारतातील गायी भारताच्या त्या त्या भागातील निसर्गनिर्मित गवतावर जगू शकतात.
 • त्यांच्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते.
 • या गायींचे योग्य पद्धतीने पालनपोषण झाले आणि त्यांना सकस आहार मिळाला, तर या उच्च दुग्ध उत्पादक बनू शकतील.

विदेशी गाय

विदेशातील गायींच्या प्रजातींपेक्षा अधिक दूध देणारी भारतीय प्रजातीच्या गायी

 • ब्राझीलमध्ये दुग्ध उत्पादनाची स्पर्धा झाली. त्या वेळी भारतीय प्रजातीच्या ‘गिर’ गायीने एका दिवसात ४८ लिटर दूध दिले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतीय प्रजातीच्या ‘गिर’ गायीलाच द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. या गायीने एका दिवसात ४५ लिटर दूध दिले. या स्पर्धेत तृतीय क्रमांकही आंध्रप्रदेशच्या ‘ओंगोल’ प्रजातीच्या गायीला (या गायीला ब्राझीलमध्ये ‘नेरोल’ असे म्हणतात) मिळाला. तिनेही एका दिवसात ४५ लिटर दूध दिले.
 • भारतीय प्रजातींच्या तीन महत्त्वाच्या गायी ‘गिर, काँकरेज अणि ओंगोल’ या जर्सी गायीपेक्षा अधिक दूध देतात.


भारतीय प्रजातीच्या गायींच्या दूधाची उपयुक्तता आणि पाश्चिमात्य गायींच्या दुधाची अपायकारकता

 • भारतीय गायी विदेशी गायींपेक्षा अधिक दूध देत असूनही भारताने विदेशी गायी आयात करणे. भारतीय प्रजातीची एक गाय तर विदेशी प्रजातीची ‘हॉलेस्टोन फ्राईजियन’ नावाच्या गायीपेक्षा अधिक दूध देते. असे असतांना भारतात दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘हॉलेस्टोन फ्राईजियन’ या विदेशी गायींची आयात होते.
 • आपल्या गायींच्या दुधात कर्करोगासारख्या रोगांवर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक ‘ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड’ असतो. विपर्यास म्हणजे या रोगावर औषध म्हणून ‘ओमेगा-६’च्या निर्मितीसाठी एक मोठा उद्योग विकसित झाला आहे. ते ‘कॅप्सूल’च्या स्वरूपात विकले जाते; परंतु आपल्या भारतीय गायींच्या दुधात निसर्गतः उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आयात केलेल्या गायींमध्ये ‘ओमेगा-६’ चे अस्तित्व काडीमात्रही आढळत नाही.
 • न्यूझीलंड येथील शास्त्रज्ञांच्या संशोधनाप्रमाणे ‘पाश्चिमात्य गायींच्या दुधात ‘बीटा केसो मर्फिन’ नावाचे रासायनिक द्रव्य असते. या द्रव्यामुळे स्मृतीभ्रंश (अल्झायमर) आणि पार्किन्सन यांसारखे गंभीर रोग होतात.
 • भारतीय गायीचे शेण ‘पंचगव्य’ बनवण्यासाठी अनुकूल असून रासायनिक औषधांना उत्तमपर्याय असणे. भारतीय प्रजातीच्या गायींचे शेणही पाश्चिमात्य देशातून आयात केलेल्या गायींच्या तुलनेत श्रेष्ठ असते. भारतीय गायींचे शेण अर्धघट्ट असते, तर आयात केलेल्या गायींचे शेण अर्र्धतरल असते. या व्यतिरिक्त देशी गायींचे शेण ‘पंचगव्य’ बनवण्यासाठी अनुकूल असून रासायनिक औषधांना उत्तम पर्याय आहे.
 • भारतीय गायींचे मूत्र एक उत्तम औषधी ! अनेक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे की, गो-मूत्र एक उत्तम औषधी आहे. अमेरिकेमध्ये गोमूत्र आणि एक प्रतिजैविक औषध यांचे ‘पेटंट’ (मिश्रणाचे संशोधनाचे सनद) मिळवले असून गोमूत्रामधे कार्यरत असणार्‍या कर्करोग प्रतिबंधक गुणांमुळे हे ‘पेटंट’ घेण्यात आले आहे.’


डॉ. श्रीकांत घरोटे